Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सप्तशृंगी गड : येत्या बुधवारी रोपवे ट्रॉली बंद राहणार

Share

नाशिक : दररोज हजारो भाविक सप्तशृंगीच्या चरणी लीन होतात. तसेच या याठिकाणी भाविकांना गडावर येजा करण्यासाठी फर्निक्युलर ट्रॉलीची सुविधा करण्यात आली आहे.

दरम्यान या फर्निक्युलर ट्रॉलीच्या दुरुस्तीकरता बुधवार (दि. ११) रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना होणार्या गैरसोयीबद्दल संस्थेने दिलगिरी व्यक्त केली आहे.

दरम्यान फर्निक्युलर ट्रॉलीची वार्षिक दुरुस्ती होत असते. त्यानिमित्ताने गुरु बक्सानी फर्निक्युलर रोपवे या कंपनीकडून हे काम करण्यात येत आहे.

तरी सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांनी पायऱ्यांचा वापर करावा असे आवाहन रोपवे ट्रॉली मॅनेजर राजीव लुंम्बा यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!