Type to search

क्रीडा नाशिक

नाशिकच्या सपना गरगटेची पुणे विद्यापीठ व्हॉलीबॉल संघात निवड

Share

नाशिक : नाशिकरोड बिट्को महाविद्यालयाची व्हॉलीबॉल खेळाडू सपना गरगटे हीची पुणे विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. सपना नाशिकरोड़च्या रेणुका क्रीड़ा असोसिएशनची खेळाडू असून ती गेल्या दहा वर्षापासून रेणुका क्रीड़ा असोसिएशनच्या मैदानावर मनोज म्हस्के आणि निखिल कुरकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करते. तसेच नाशिकरोड बिट्को महाविद्यालयाचे क्रीड़ा संचालक प्रा.दिलिप लोंढे यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

नुकत्याच पुणे येथे आयोजित आंतर विभागीय स्पर्धेत सपनाने नाशिक विभागाचे प्रतिनीधीत्व केले. सपनाने या स्पर्धेत चांगला खेळ करून नाशिक विभागाला तिसरा क्रमांक मिळवुन देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. तिच्या या अष्टपैलु खेळाची दखल घेवुन सपनाची पुणे विद्यापीठाच्या संघात निवड करण्यात आली आहे. पुणे विद्यापीठ संघात निवड झालेली ती नाशिक विभागाची एकमेव खेळाडू आहे.

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा राजस्थान येथे आयोजित करण्यात आल्या असून या स्पर्धेसाठी आज पुणे विद्यापीठ संघ राजस्थान येथे रवाना झाला. सपना गरगटेच्या या निवडीबद्दल तिचा रेणुका क्रीड़ा असोसिएशनच्या वतीने क्रीड़ांगणावर रेणुका असोसिएशनचे संचालक लंकेश गाड़ेकर आणि नाशिक जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष क्रीडा संघटक आनंद खरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!