Type to search

नाशिक

सपकाळ’ च्या प्राध्यापकांना 15 दिवसात वेतन

Share

नाशिक । प्रतिनिधी
त्र्यंबकरोडवरील सपकाळ नॉलेज हबमध्ये सुरू असलेल्या प्राध्यापकांचे वेतन व विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यात आला आहे. येत्या 15 दिवसाच्या आत प्राध्यापकांना रखडलेले वेतन टप्प्याटप्प्याने दिले जाईल, असे लेखी आश्वासन संस्थेचे व्यवस्थापकीय सचालक डॉ. रविंद्र सपकाळ यांनी दिले आहे.

तसेच (दि. 9) पासून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करून तासिकांना हजर रहावे, असे निर्देश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. बागल यांनी दिले आहेत.

(दि. 8 ) रोजी दुपारी 12 वाजता संस्थेचे अध्यक्ष डॉ. रविंद्र सपकाळ यांच्या समवेत महाविद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक प्रतिनिधी व विद्यार्थी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पार पडली. त्यात महाविद्यालयातील विद्यार्थी जसेजसे प्रवेश घेतील, व ज्या प्रमाणात फी ची रक्कम जमा होईल, त्याच्या प्रत्येक दुसर्‍या दिवशी सर्व प्राध्यपक व इतर घटकांचे वेतन टप्प्याटप्प्याने अदा केले जाणार आहे.

त्यासाठी पाच प्राध्यापक व प्राध्ययपकेतर कर्मचार्‍यांची मॉनिटरींग कमिटी स्थापन करण्यात आली आहे. ही कमिटी लक्ष ठेऊन अहवाल अध्यक्ष डॉ. सपकाळ यांना देणार आहेत. सर्व कर्मचार्‍यांचे मागील थकलेले वेतन आणि शासनाकडे थकलेली शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर वेतन अदा केले जाईलच व यापुढील वेतनामध्ये नियमितता आणण्यासाठी डॉ. रविंद्र सपकाळ लक्ष घालणार आहे.

बैठकीमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचार्‍यांचे वेतन येत्या 15 दिवसाच्या आत निकाली काढण्यात येईल, असे लेखी आश्वासन डॉ. रविंद्र सपकाळ यांनी दिले असून या आश्वासनास प्राध्यापक प्रतिनिधींनी लेखी मान्यता दिली आहे. यामुळे सपकाळ नॉलेज हबमधील वेतन व शैक्षणिक कामकाजाचा तिढा कायमस्वरूपी सुटल्याचे प्राचार्य बागल यांनी सांगितले आहे.

बैठकीस सपकाळ नॉलेज हबचे आस्थापना विभागाचे संचालक डॉ. बी. बी. रायते, प्राचार्य डॉ. एस. बी. बागल, पालक प्रतिनिधी सुनिल देसाई, मॉनिटरींग कमिटी सदस्य प्रा. लता मोरे, प्रा. जे. आर. महाजन, प्रा. पी. एस. तळमळे, प्रा. पी. डी. जाधव, प्रा. प्रशांत काळे आदींसह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया तीन दिवसांच्या आत पूर्ण करावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. बागल यांनी केले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!