Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जिल्ह्यात ठिकठिकाणी संविधानाचा जागर

Share

नाशिक : जिल्ह्यातील विविध ठिकाणी संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरासह तालुक्यातील अनेक शाळा,संस्था, संघटना यांच्या माध्यमातून संविधान दिनाचे औचित्य साधत संविधानाचे महत्व पटवून देण्यात आले.

दरम्यान संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस. शहरातील मनपा मुख्यालयात नवनिर्वाचित महापौर सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमास मा.उपमहापौर भिकुबाई बागुल,सभागृहनेते सतीश सोनवणे,नगरसेवक चंद्रकांत खोडे,नगरसेविका स्वाती भामरे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

इगतपुरीतही संविधानाचा जागर
इगतपुरी । संविधानाचा सन्मान करून, त्याविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे.संविधानाने दिलेल्या अधिकारांमुळेच आपले अस्तित्व आहे. एकता व अखंडता ही भारतीय संविधानामुळे देशात एकत्र नांदत असल्याचे मत दिवाणी न्यायाधीश आर. एन. खान यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

इगतपुरी न्यायालयात संविधान दिनानिमित्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर वकील संघाचे अध्यक्ष अँड. रतनकुमार इचम, प्रा. नितीन सोनवणे, अँड. जितेंद्र केदारे, अरुण दोंदे आदी उपस्थित होते.

नांदुर-शिंगोटे
नांदुर-शिंगोटे : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी संविधान प्रश्न जागृती व्हावी यासाठी संविधानाच्या सामूहिक वाचन करण्यात आलेले संविधान अनेक वक्त्यांनी आपले मत मांडले.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शशिकांत येलेकर सर यांनी भारतीय संविधानाने समता बंधुता व न्याय यावर अवलंबून असणारे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. त्यामुळे अनेक जाती धर्म असलेला विविधतेने नटलेला देश आज एक संघ दिसून येतो त्याची एकमेव कारण भारताचे संविधान होईल विशेष म्हणजे संविधानामुळे महिलांना विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत, असे मत येरेकर यांनी याप्रसंगी मांडली अध्यक्षस्थानी सरपंच गोपाळ शेळके होते. याप्रसंगी नवनिर्वाचित उपसरपंच विद्याताई बाबर तसेच ग्रामपंचायत सदस्य आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जि.प.प्रा.शाळा.ठाणगाव येथे संविधान दिन साजरा

हतगड : सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक शाळा ठाणगाव येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई शहरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या शुर विरांना आणि निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मापारी यांनी संविधान प्रास्तविक करुन, संविधानाची शपथ देऊन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.

यावेळी चौधरी यांनी संविधांबाबत मुलांना मार्गदर्शन केले. शाळेतील मुलांनीसुद्धा संविधानाचे वाचन करण्यात आले.नंतर निबंध स्पर्धा,वकृत्व स्पर्धा,चर्चा सञ घेण्यात आले.

समाज कल्याण विभागात ‘संविधान दिन’ साजरा

नाशिक : २६ नोव्हेंबर २०१९ देशभर ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ‘संविधान दिन’ कार्यक्रमांचे राज्यभर आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरात संविधान दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रादेशिक उपायुक्त मा.श्री.भगवान वीर यांच्या मागोमाग अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात केले.

यावेळी संविधान प्रास्ताविका वाचन कार्यक्रमांत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरातील प्रादेशिक उपायुक्त, विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सहाय्यक आयुक्त, शासकीय वसतिगृह, शासकीय अंधशाळा, शासकीय आयटीआय, माहिला व बालकल्याण प्रादेशिक उपायुक्त कार्यालय, जिल्हा बालविकास अधिकारी कार्यालय, व विविध मागासवर्गीय महामंडळातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्यने संविधान प्रास्ताविका वाचन कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!