Type to search

maharashtra नाशिक मुख्य बातम्या

‘समृध्दी’साठी जमीन न देणार्‍यांना नोटीसा

Share

नाशिक । प्रतिनिधी
पाटबंधारे विभागाने विकास कामांसाठी सिन्नर, इगतपुरी या तालुक्यांतील काही गावांमधील जमिनीचे वीस वर्षांपुर्वी अधिग्रहण केले होते. या जमिनींचा बहुचर्चित ‘समृध्दी’ महामार्ग प्रकल्पात समावेश होत आहे. मात्र, जमिनधारकांना अगोदरच मोबदला दिला असूनही ते आता जमिनीची मालकी सोडण्यास नकारघंटा वाजवत आहेत. अशा जमिनधारकांना वठणीवर आणण्यासाठी जिल्हा प्रशासन त्यांना कायदेशीर नोटीसा बजावत आहे.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज (दि.28) ‘समृध्दी’ महामार्ग प्रकल्प अधिकार्‍यांच्या टास्क फोर्सची बैठक घेतली. त्यात महामार्ग कामाची प्रगती व अडथळे याचा आढावा घेण्यात आला. पाटबंधारे विभागाने साधारणत: 15 ते 20 वर्षांपुर्वी सिन्नर, इगतपुरी तालुक्यातील मर्‍हळ बुद्रूक, खंबाळे, पिंपळगाव डुकरा, डुसंगवाडी या गावातील जमिनींचे भूसंपादन केले होते. संबंधित शेतकर्‍यांना त्यावेळी मोबदला देखील अदा करण्यात आला होता.

त्या जमिनींचा ‘समृध्दी’ महामार्गात समावेश होत आहे. मात्र, या शेतकर्‍यांकडून आता जमिनी देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे ‘समृध्दी’ महामार्गाचे कामाच्या अडचणीत भर पडली आहे. अगोदरच काही भूसंपादनाचे प्रकरणे हे न्यायप्रविष्ठ आहेत. त्यामुळे महामार्गाचे काम काही ठिकाणी खोळंबले होते. त्यात या नवीन प्रकरणाची आडाकठी निर्माण झाली आहे.

मात्र, प्रशासनाने हे प्रकरण गंभीर घेतले आहे. मोबदला घेऊनही जमीन देण्यास नकार देणार्‍या शेतकर्‍यांना कायदेशीर नोटीसा पाठविण्याची तयारी केली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.

गाळ उपसा करणार्‍यांना झापले
बैठकीत महामार्गाच्या कामासाठी पाणी उपलब्धता, गौण खनिज परवानग्या व इतर आवश्यक परवाने याबाबत आढावा घेतला गेला. महामार्ग कामासाठी मोठ्या प्रमाणात माती – मुरुमाची गरज आहे. ते बघता प्रशासनाने छोटे बंधारे, धरण आदीतील गाळ काढण्याची परवानगी ठेकेदारांना दिली होती. मात्र, नियम धाब्यावर बसवत मोठ्या प्रमाणात गाळ उपसा केल्याचे समोर आले. या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी ठेकेदारांना खडसावत प्रशासनाकडून जी यादी दिली जाईल, त्याच ठिकाणी गाळ काढळा जावा, असे बजावले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!