Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

एकलहरे : सामनगावरोड परिसरात पुन्हा बिबट्या जेरबंद

Share

एकलहरे। वार्ताहर : आज (दि.२१) सकाळच्या सुमारास सामनगावरोड परिसरात आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यामुळे नाशिक परिसरात भितीचे वातावरण आहे.

नाशिक मनपा हद्दीतील चाडेगाव शिवारात दहा ते बारा दिवसांपूर्वी निशांत वाघ यांच्या शेतात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता. चाडे सामनगावरोड काही दिवसांपासून बिबट्याने ठाण मांडला होता. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी  मंगेश वाघ यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात काल, शनिवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

नाशिक पश्चिम सहाय्यक वनसंरक्षक, राजेंद्र मगदूम यांनी सांगितले, “आम्ही चाडगाव शिवारात मादा बिबट्या पकडला आहे. बिबट्या दिसण्याच्या आम्हाला वारंवार तक्रारी मिळत होत्या. त्यानुसार आम्ही जवळच्या शेतात सापळा रचला आणि बिबट्याला जेरबंद केले. सदर बिबट्या हि मादा आहे. तिची योग्य अशी वैद्यकीय तपासणी करू. त्यानंतर तिला तिच्या नैसर्गिक परीवासात सोडले जाणार आहे. गावाजवळच्या लोकांच्या गर्दीमुळे आम्हाला खूप अडचणी आल्या.”

आज, रविवारी सकाळी ही बाब निर्दशनास आली. बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी परिसरात पसरताच बघ्याची मोठी गर्दी झाली होती. वनविभागाकडून या बिबट्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर नागरिकांकडून अजूनही या परिसरात बिबट्या व पिल्ले असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

बिबट्याचा वाढता वावर
वन अधिकार्यांनी सांगितले, “सुला वाइन परिसरातील भाग, सिन्नर-घोटी शिवार, शिंदे-पळसे शिवार, गोदावरी नदी  हा परिसर बिबटयांसाठी अतिशय अनुकूल असून या ठिकाणी तो चांगल्या प्रकारे सभोवतालच्या परिसराशी जुळवून घेतो. बिबट्या हा परिस्थतीनुसार स्वतःमध्ये बदल घडवून घेत असल्याने मानवाने काही हस्तक्षेप केल्यास किंवा निवासस्थानात व्यत्यय आणल्यास बिबट्यास त्रास देणारच. मानवाने आपले निवासस्थान शाबूत ठेवण्यासाठी बिबट्याचा अधिवास संपुष्ठात आणला आहे. यामुळे मानवाने बिबट्याला त्रास न देता मानवाने समायोजन करणे गरजेचे ठरते.

– शिवाजी फुले, डीसीएफ, नाशिक वेस्ट झोन

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!