Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

साकुर येथील युवा कीर्तनकार सहाणे यांची फक्त मराठी वाहिनीवर निवड

Share

बेलगाव कुऱ्हे । लक्ष्मण सोनवणे : युवा अवस्थेत कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करणारा साकुर येथील शेतकरी कुटुंबातील सूर्यकांत महाराज सहाणे या १८ वर्षीय युवा किर्तनकाराची फक्त मराठी वाहिनीवर कीर्तन करण्यासाठी निवड झाल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

बुधवारी १२ जून रोजी सकाळी साडे सात वाजता ‘जयाचेही द्वारी, सोन्याचा पिंपळ’ या अभंगावर कीर्तन प्रसारित होणार आहे. लहानपणापासूनच पांडुरंगावर नितांत श्रद्धा ठेवून वडील अर्जुन सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बलायदुरी येथील स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुरुवर्य भागवताचार्य विजय महाराज चव्हाण यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सहा वर्षे सातत्याने वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेऊन युवा कीर्तनकार होण्याचा बहुमान मिळवला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील पन्नास गावात किर्तनरुपी सेवा देण्याचे कार्य या युवकाने केले आहे.

उन्हाळ्यात बालसंस्कार शिबिरात लहान लहान मुलांना वारकरी शिक्षण देण्याचे महत्वपूर्ण काम हा युवक करीत असतो. क्षणा क्षणाला कीर्तनाची सेवा करण्याचा आनंद कोणत्याही कार्याला आभाळाची उंची व सागराची खोली मिळवून देऊ शकतो असे युवा कीर्तनकार सूर्यकांत सहाणे महाराज याने सांगितले.

थोरांचा आदर, गुरुजनांचे ऋण, आई वडिलांचे पूजन, दर्शन, गायन, पखवाजवादन, भजन, कीर्तन करीत टाळ मृदूंगाच्या गजरात हा युवक कीर्तनाच्या माध्यमातून परमार्थिक कार्यातून जनजागृती करीत असल्याने त्याची दखल मराठी वाहिनीने घेतल्याबद्दल पंढरीनाथ महाराज सहाणे, मधुकर सोनवणे, कैलास संधान बेलुचे सरपंच दत्तू तुपे, शरद वाजे, शांताराम टोचे, नितीन गटखल, तुकाराम कुकडे , धनंजय सहाणे यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!