Type to search

अयं परश्या … अरं ऐकलं का… आर्ची पास झाली रे

Breaking News maharashtra मुख्य बातम्या हिट-चाट

अयं परश्या … अरं ऐकलं का… आर्ची पास झाली रे

Share

मुंबई : नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला असून सैराटफेम रिंकू उर्फ आर्ची देखील बारावीची परीक्षा पास झाली आहे. रिंकू राजगुरूला बारावीत ८२ टक्के मिळाले आहेत.

सैराट प्रदर्शित झाल्यानंतर आर्चीने दहावीची परीक्षा दिली होती. त्यावेळी देखील सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. दहावीत असतांना रिंकू राजगुरूंच्या शूटिंगच्या तारखा असल्याने नियमित शाळेत हजार राहता आले नव्हते. त्यामुळे तिने बाहेरूनच दहावीची परीक्षा दिली होती. याआधी रिंकू राजगुरुने डॉक्टर व्हायची इच्छा व्यक्त केली आहे.

यंदा बारावी बोर्डाचा ८५.८८ टक्के इतका निकाल लागला आहे. विशेष म्हणजे, सालाबादप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण तब्बल ७.८५ टक्क्यांनी अधिक आहे. आज दुपारी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे आणि सचिव डॉ. अशोक भोसले यांनी निकालाबाबतची माहिती दिली आहे.

यावेळी सांगण्यात आले की,  राज्यातील तब्बल ४ हजार ४७० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. यंदा १२ वीच्या परीक्षेला राज्यभरात एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ८ लाख ४२ हजार ९१९ तर विद्यार्थिनींची संख्या ६ लाख ४८ हजार १५१ इतकी होती. तसंच यंदा गेल्यावर्षींच्या तुलनेत एकुण निकालात २.५३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!