Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इंदिरानगर : पांडवलेणी येथे अडकलेल्या व्यक्तीची सुखरुप सुटका; सहा महिन्यातील चौथी घटना

Share

इंदिरानगर : पांडवलेणी येथे ट्रेकिंग करायला गेलेले नवीन नशिक येथील एक व्यक्ती डोंगरावर पाय घसरुन पडल्याने जखमी झाल्याची घटना घडली. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बिट मार्शल व गिर्यारोहक संस्थेचे चेतन खर्डे व त्यांचे पाच ते सहा सहकाऱ्यांनी सुखरूप खाली आणल्याने सुटकेचा विश्वास सोडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि.२३) शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पांडवलेण्याच्या निसर्गरम्य वातावरणात ट्रेकिंग करण्यासाठी नवीन नाशिक उत्तम नगर येथे राहणारे बाळू धनाजी सूरसे (५३) मित्रांसोबत सकाळी सहा वाजेच्या सुमारास पांडवलेणी येथील डोंगरावर फिरण्यासाठी गेले होते. खाली उतरत असताना यावेळी सुरसे यांना डोंगर सर करण्याचा मोह झाला.

पांडवलेणीच्या पाठीमागील भागातील डोंगर त्यांनी चढण्यास सुरुवात केली. मात्र डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर जमिनीच्या दिशेने पुन्हा जाण्याचा मार्ग धुसर दिसू लागल्याने त्यांचा पाय सरकून ते वीस-पंचवीस फूट खाली घसरले.

भ्रमणध्वनीवरून त्वरित उपस्थित पर्यटकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पो.ना. रविंद्र राजपूत,पो. ना. राजेंद्र निकम तसेच गिर्यारोहक संस्थेचे चेतन खर्डे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्वरित स्ट्रेचर मध्ये टाकून त्यांना खालीआणले व त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!