विघ्नहर्ता बक्षीस योजनेअंतर्गत गणेश मंडळांचा सत्कार

0

नाशिक | सण उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचू नये यासाठी नाशिकचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून विघ्नहर्ता बक्षीस योजना राबविण्यात आली होती. या योजनेत समितीने दिलेल्या अहवालानंतर जिल्हास्तर, उपविभागस्तर तसेच पोलीस स्टेशन स्तर अशा तीन स्तरावर प्रत्येकी पाच गणेश मंडळांची निवड करण्यात आली होती.  त्यानुसार मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार लासलगाव येथे नुकताच पार पडला.

परीक्षण समितीच्या कार्यक्षेत्रातील गणेश मंडळाची समिती सदस्य हे प्रत्यक्ष पाहणी करून गणेश मंडळांकडून कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो, गणेशोत्सवा दरम्यान उभारण्यात आलेले देखावे हे समाज उपयोगी संदेश देतात काय? व पर्यावरण संरक्षण कायदा व इतर प्रचलित कायदयांचे उल्लंघन होऊ नये म्हणुन कोणत्या उपाय योजना केल्या? गणेशोत्सव साजरा करतांना सामाजिक बांधिलकी जोपसली आहे का? अशा दहा मुंदयावर गुण देण्यात आले होते.

पोलीस स्टेशन स्तर, उपविभागस्तर व जिल्हास्तर प्रत्येकी प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्‍तेजनार्थ असे पाच
मंडळाची निवड करण्यात आली होती. त्यांतर्गत १५ डिसेंबर २०१८ रोजी लासलगाव येथील शिवकमल मंगल कार्यालय येथे लासलगाव पोलीस स्टेशन, निफाड पोलीस स्टेशन, सायखेडा पोलीस स्टेशन तसेच निफाड उप विभागातील निवड करण्यात आलेले प्रत्येकी पाच गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पोलीस अधीक्षक संजय दराडे, प्रमुख अतिथी म्हणुन  उपविभागीय अधिकारी माधव पडीले, निफाडचे पोलीस निरीक्षक विष्णु आव्हाड, सायखेड्याचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, ज्ञानेश्‍वर जगताप, जि.प. सदस्य, प्रकाश पाटील, राजु चाफेकर व विजेते गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

यावेळी संजय दराडे यांनी समाजातील लोकांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी, कायदा व नियमांचे पालन करून गणेशाोत्सव शांततेत व आंनदात साजरा करावा या उददेशाने विघ्नहर्ता बक्षीस योजना सुरू केल्याचे नमुद करून यापुढेही अशाच प्रकारे शांततेने व एकोप्याने सर्व धर्मीयांचे सण उत्सव साजरे करणे बाबत आवाहन केले.

या गणेशमंडळांचा झाला सत्कार

LEAVE A REPLY

*