यात्रेच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगीगडावर लॉज, मद्य दुकानांवर छापे

0

सप्तशृंगी गड | वार्ताहर

सप्तशृंगी गडावरील अनधिकृत धंद्यांवर आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. काल येथील अनेक लॉज आणि मद्याची दुकाने तपासण्यात आली. यात हजारो रुपयाचे देशी मद्य हस्तगत करण्यात आले असून एकास ताब्यात घेतले आहे.

अचानक कळवण पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध धंदे चालविणाऱ्याचे धाबे दणाणले आहे. पोलीसांनी काल टाकलेल्या छाप्यात देशी दारु विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून ३ हजार १२० रुपये किंमतीचा मद्य जप्त केले तर संशयित संदीप युवराज पाटील (वय २८, रा. स.गड) यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. गडावरील १४ लॉजिंगचीही यावेळी पोलिसांनी कसून तपासणी पोलिसांनी केली.

सप्तशृंगी गडावर अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसाना मिळाली होती. त्यानुसार कळवण पोलीस त्याण्याचे पथक गडावर आले. त्यांनी देशी दारु दुकानांवर छापा टाकत कारवाई केली.

अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना हद्दपार केले जाणार असल्याची पोलिसांनी देशदूतशी बोलताना दिली.  कळवणचे उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी ही कारवाई केली.

कारवाई सुरुच राहील

परिसरात कुठेही अवैध दारू धंदे सुरू असतील तर पोलिसांना तातडीने कळवावे,जेणेकरून कारवाई करता येईल या कामी ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करावे प्रत्येक गावात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अवैध धंदेवाल्यावर कारवाया सुरू राहतील

उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे (कळवण)

LEAVE A REPLY

*