Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

….म्हणून ग्रामीण पोलिसांना आजोबांनी म्हटले ‘थँक्स’

Share

नाशिक : दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे समाजात घडणाऱ्या गोष्टींचा संबंध येत असतो. मुळात कायदा आणि समाज यांचे अतुट नाते आहे.

समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे, सर्वसामान्य लोकांचे रक्षण करणे, गुन्ह्यांना आळा घालणे अशा अनेक कामे पोलिसांना करावी लागतात. मात्र काहीवेळा पोलीस जनतेचा विश्वास जिंकण्यास असमर्थ ठरतात. यामुळे समाज आणि कायदा यामध्ये व्यत्यय निर्माण होतो. दरम्यान पोलीस व जनता संबंध सुधारण्यास ग्रामीण पोलीस दल नेहमीच तत्परतेने कर्तव्य बजावत असते.

नाशिक शहरातील अमृतधाम परिसरात राहणारे जेष्ठ नागरीक श्री. नाना गोविंद गिते (वय ८६) असून सिन्नर तालुक्यातील मेंढी शिवारातील जमीन आणि विहिरीवर स्थानिक नागरिकांनी ताब्यात घेतली होती. दरम्यान गीते यांनी स्थानिक नागरिकांविरुद्ध नयायलायात दावा दाखल केला होता. या प्रकरणात सिन्नर पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कर्तव्य बजावुन तक्रारदार यांना त्यांचे मिळतीचा कब्जा मिळवुन दिला आहे.

ग्रामीण पोलीस दलातील सिन्नर एम.आय.डी.सी. पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री.एस.टी.पाटील व कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे योग्य काम करून दिल्याबद्दल जेष्ठ नागरीक श्री.नाना गिते यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे पत्राव्दारे आभार व्यक्त केले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!