नाशिक ग्रामीणचे सपोनि. विलास ताटीकोंडलवार तामिळनाडूत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

0
येवला । कोणत्याही क्षेत्रात आपल्या कार्याची ओळख आपल्या कामावरून होत असते त्यामुळे कोणतेही काम प्रामाणिक केले तर यश निश्चित मिळते. त्यानुसार अल्पावधीतच येवला तालुका ग्रामीणचे कर्तव्यदक्ष असलेले सहायक पोलीस निरीक्षक विलास ताटीकोंडलवार यांची पुणे येथे महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधीनी रामटेकडी येथे होणार्या विशेष प्रशिक्षण सराव शिबिरासाठी नाशिक जिल्ह्यातुन एकमेव निवड झाली.

8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत विशेष प्रशिक्षण संपन्न होणार आहे. या प्रशिक्षणानंतर तामिळनाडू येथे 61 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यास महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान ताटीकोंडलवार यांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या या निवडीने येवल्याबरोबर नाशिक जिल्ह्याचे नाव उंचावणार आहे.यातून ध्येय निश्चित असेल तर यशनिश्चित मिळते हे ताटीकोंडलवार यांनी सिद्ध केले.

कारण परभणी येथे पोलीस कॉन्स्टेबल या पदावर 2002 मध्ये कार्यरत असताना एमपीएससी च्या माध्यमातून पीएसआय या पदासाठी 2010 मध्ये परीक्षा देवून 2011 मध्ये पो.उपनिरीक्षक या पदावर निवड झाली.व नाशिक येथे एक महिना प्रशिक्षण घेवुन त्यानंतर 2012 मध्ये तासगाव तुरची जि.सांगली येथे दिक्षांत सोहळ्यात तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे हस्ते सत्र क्रमांक 104 ला प्रथम क्रमांक मिळवून विशेष तलवार संपादन केली होती.
महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्यात गोल्ड मेडलही संपादन केले.

त्यात बेस्ट कँडेट,ग्राऊंड, लॉ,ऑलराउंड अशा आठ पैकी पाच प्रकारात उल्लेखनीय काम केले होते.तसेच 2014 मध्ये गृहखात्याच्या वतीने हरियाणा येथे 57 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात शुटिंग या प्रकारात सिल्व्हर पदक प्राप्त केले होते.त्यामुळे मुंबई येथे तत्कालीन पोलीस महासंचालक संजीव दयाल,औरंगाबाद येथील पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सत्कार करून यथोचित गौरव केला होता.

आता पुन्हा दि.8 जाने ते 12 जानेवारी 2018 तामिळनाडू येथे होणार्या 61 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी ताटीकोंडलवार यांची निवड झाली.

त्यांच्या या निवडीमुळे नाशिक ग्रामीण चे पोलीस अधिक्षक संजय दराडे,उपविभागीय पोलीस अधिक्षक मनमाडचे चंद्रसेन देशमुख, येवला ग्रामीण चे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर, खैरणार आदींनी अभिनंदन केले. ताटीकोंडलवार यांनी परभणी, औरंगाबाद, नाशिक येथे सेवा केली.आता येवला ग्रामीण मध्ये कार्यरत आहे.

LEAVE A REPLY

*