Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

ग्रामीण भागातील राजकारणामुळे तरुण पिढी दिशाहीन

Share

नाशिक | गोकुळ पवार  सध्या भारताची ओळख ही तरुणाईचा देश म्हणून जगभरात केली जाते. त्यातील जास्तीत जास्त तरुण हा गाव खेड्यात पाहायला मिळतो. शहरातील तरुणांना जसे टी २० क्रिकेटचे वेड आहे, तसेच वेड ग्रामीण तरुणाला देखील आहे. तर दुसरीकडे तरुणांच्या आधारावर २०२० मध्ये भारत महासत्ता होण्याची स्वप्ने बघतो आहे. परंतु याच विकासाच्या गर्दीत लोकशाही व्यवस्थेत याच तरुणांचं स्थान कुठे आहे? हा प्रश्न पडतो.

खेड्याकडे चला’ असा मूलमंत्र घेत आजचा ग्रामीण तरुणही अद्ययावत झाला आहे. त्यामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होत आहे. परंतु गावातील तरुणपिढी दिशाहीन झाल्याचे चित्र आज पहावयास मिळत आहे. आजच्या घडीला गावातील तरुण राजकारण विषयाकडे वळू लागला आहे.

ग्रामीण भागातील राजकीय नेतृत्व तरुणांना विविध प्रलोभने दाखवून डोक्यात हवा भरत आहे. ग्रामीण भागातील राजकारणामुळे तरुण पिढी दिशाहीन होत असून या तरुणांना वेळीच योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.

आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. दरम्यान आतापासूनच इच्छुकांनी प्रचार करण्यास सुरवात केली आहे. या प्रचारकरण्या मध्ये ग्रामीण तरुणांचा सहभाग अधिक दिसून येतो. यामध्ये ही तरुणाई सोशल मीडिया, ऑफलाईन प्रचार करण्यात व्यस्त आहे.

राजकीय कार्यकर्त्याची ‘वापरा आणि फेका’ ही भूमिका गावातील तरुणांना लक्षात येताना दिसत नाही. परिणामी एखादा तरुण राजकीय नेतृत्व म्हणून उदयास येत असेल तर त्याची स्थानिक नेतृत्व गळचेपी करतांना दिसून येतात. तरी देखील ग्रामीण तरुणांचे आकर्षण वाढत आहे.

ग्रामीण भागातील तरुणांची राजकीय नेत्यांकडून दिशा केली  जाते. त्यांचा वापर केवळ निवडणुका पुरता केला जातो. मात्र त्यांचा प्रकारे कोणत्याही ही मंडळी होऊ देत नाही. कार्यकर्ता हा शेवट पर्यंत कार्यकर्ता म्हणूनच राहतो.

-भगवान महाले, हिरडी  

अनेक वर्षांपासून राजकरणाच्या माध्यमातून समाजकारण करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु समाजकारण कमी आणि राजकारण अधिक होताना दिसून येते. परंतु अद्यापही ग्रामीण भागातील तरुण जागा झालेला नसून यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

-सुनील सानप, शिवरे (निफाड ) 

ग्रामीण भागातील काही प्रस्थापित राजकीय नेतृत्व तरुणांना राजकीय सक्रियता मिळू देत नाहीत. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे गावाकड तरुण नवीन नेतृत्व उदयास येत नाही.

-प्रशांत काकड, वणी

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!