जागतिक सूर्यनमस्कार दिन : ‘रुंग्टामध्ये’ आज 31 हजार सूर्यनमस्कार

0

नाशिक । प्रतिनिधी
जागतिक सूर्यनमस्कार दिना निमित्त जु.स.रुंग्टा हायस्कूलमध्ये विद्यार्थी 31 हजार सूर्यनमस्कार घालणार असून याची जोरदार तयारी सुरू आहे.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या जु.स.रुंग्टा हायस्कूलमध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त 477 विद्यार्थी 31हजार सूर्यनमस्कार घालणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (दि. 12) सकाळी 8 वाजता शाळेच्या मैदानावर करण्यात आले आहे. या कार्याक्रमाचे अध्यक्ष स्थानी रुंगकटा शाळेचे शालेय समिती अध्यक्ष मिलिंद कचोळे हे उपस्थित राहणार असून युवा भारत पतंजली नाशिक जिल्ह्याचे प्रभारी ज्ञानेश्वर टर्ले, संस्थेचे सहसचिव प्रसाद कुलकर्णी, शाळेचे मुख्याध्यापक तोताराम घुगे, संस्थेचे माजी सेक्रेटरी तथा ज्येष्ठ कला शिक्षक अरुण पैठणकर, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम असल्याने शरीराच्या सर्व भागांना यामुळे व्यायाम होऊन आरोग्य सुदृढ व निरोगी बनते. क्रीडाभारतीने 8 आसनांची मालिका तयार करून सूर्यनमस्कार तयार केले आहे. यामध्ये ऊर्ध्व हस्तासन, हस्तपादासन, अश्वसंचालनासन, मकरासन, साष्टांगनमस्कारासन, भुजंगासन, पर्वतासन, या आठ आसनांचा यात समावेश आहे. त्याचबरोबर पूरक रेचक, व कुंभक या आसनांच्या स्थिती यात आहे.यामुळे शरीर सुदृृढ व निकोप बनते.

क्रीडाभारतीची स्थापना झाल्यापासून रथसप्तमी हा जागतिक सूर्यनमस्कार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगात विविध ठिकाणी मोठ्या संख्येने सूर्यनमस्कार घातले जातात. या दिनाचे औचित्य साधून जु.स.रुंग्टा हायस्कूलचे विद्यार्थी 3100 सूर्यनमस्कार घालून सुदृढ आरोग्याचा संदेश देणार आहेत.

LEAVE A REPLY

*