Type to search

Breaking News क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

नाशिकच्या पूनम सोनुनेची राष्ट्रीय अँथलेटिकमध्ये सुवर्णभरारी

Share

नाशिक : नाशिकची धावपटू पूनम सोनुने हिने तामिळनाडू येथील तिरुवन्नामलाई येथे झालेल्या अँथलेटीक १७ व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय कनिष्ठ अँथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत तीन हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

दरम्यान तामिळनाडू येथील तिरुवन्नामलाई येथे फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या राष्ट्रीय कनिष्ठ अँथलेटिक अजिंक्यपद स्पर्धा २४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येत आहेत. मंगळवारी (दि. २४) झालेल्या स्पर्धेत नाशिकच्या पुनमने सुवर्ण पदक पटकावले असून तिने तीन हजार मीटरचे अंतर ९ मिनीट ५२ सेकंदात पूर्ण केले. या स्पर्धेत हरियाणाच्या किरण हिने ९ मिनीटे ५५ सेकंदाची वेळ नोंदवत रजत पदक पटकावले.

दरम्यान पूनम हि सध्या विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!