‘नाएसो’तर्फे रुंग्ठा विद्यालयात शाडू गणेशमूर्ती कार्यशाळा

0

नाशिक । नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेत आज विद्यार्थ्यांनी धडे गिरवत आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या.

यावेळी प्रसाद कुलकर्णी म्हणाले, प्रत्येकाने पर्यावरणाशी मैत्री साधली पाहिजे व आपल्याकडून पर्यावरणाला कोणताही धोका पोहोचणार नाही यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाने सण- उत्सवांमध्ये पर्यावरणाशी न खेळता त्याच्या संरक्षणासाठी प्लास्टिक, थर्माकोल, प्लास्टर ऑफ पॅरिससारख्या पर्यावरणाला अपायकारक असलेल्या वस्तूंचा उपयोग टाळला पाहिजे. आपण आज तयार केलेल्या गणेशमूर्तींची स्थापना आपल्या घरी मोठ्या श्रद्धेने करा. त्याने मनाला व शरीराला ऊर्जा प्राप्त होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यशाळेत 50 विद्यार्थी व 50 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता. उत्सवाच्या नावाने आज जो पर्यावरणाचा र्‍हास होत आहे तो थांबवा म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. यामधून विद्यार्थ्यांनी पर्यावरणाशी मैत्री करून स्वच्छता राखणे व पर्यावरणाचा समतोल साधणे हा संदेश दिला. सुरुवातीला स्वप्नील कट्यारे यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती कशी तयार करायची याबद्दल मार्गदर्शन केले. तद्नंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने गणेशमूर्ती तयार केल्या. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही गणेशमूर्ती तयार करण्याचा आनंद घेतला.

LEAVE A REPLY

*