Type to search

Breaking News नाशिक

शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी आरटीओकडून ‘या’ उपाययोजना

Share

नाशिक : शहरातील वाढते वायुप्रदूषण कमी करण्यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये १ एप्रिल २०१७ पासून बीएस-आयव्ही युरो-4 (BS-IV (Euro4) मानांकने प्राप्त झालेल्या वाहनांचीच नोंदणी कार्यालयामार्फत करण्यात येते.

नाशिक परिक्षेत्रासाठी सर्व मार्गांवर चालणाऱ्या कुलकॅब नोंदणी दिनांकापासून १२ वर्षे व मिटर टॅक्सी आणि ऑटो रिक्षा नोंदणी दिनांकापासून २० वर्षे एवढी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. २०१८-१९ या कालावधीत १ हजार ५७२ व ४२ टॅक्सींची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

कार्यालयात परिवहन वाहनांची योग्यता प्रमाणपत्र तपासणीकरीता स्वयंचलीत वाहन तपासणी केंद्र असून त्यामध्ये वाहनांची प्रदुषण नियंत्रण चाचणी घेण्यात येते. व त्यानंतरच त्यास योग्यता प्रमाणपत्र जारी करण्यात येते. मार्च २०१९ अखेर स्वयंचलीत वाहनांची तपासणी केंद्राद्वारे १ लाख ३ हजार ९२७ वाहनांची पीयुसी चाचणी करण्यात आलेली आहे.

कार्यालयात कार्यरत वायुवेग पथकांद्वारे पीयुसी नसलेल्या वाहनांना प्रतिवेदन देऊन कारवाई करण्यात येते. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत २ हजार ६३० वाहनांची तपासणी होऊन १ हजार ४९७ वाहनांना प्रतिवेदन जारी करण्यात आलेले आहे व रुपये ७ लाख ९९ हजार तडजोड शुल्काची वसुली करण्यात आली आहे.

कार्यालयामार्फत ऑनलाईन वाहनांची तपासणी करुनच पीयुसी प्रमाणपत्र देणाऱ्या केंद्रालाच प्राधिकारपत्र जारी करण्यात येत आहे. या केंद्रांवर अचानकपणे जाऊन नियमाप्रमाणे काम होत आहे की नाही याची तपासणी करुन नियमांचे उल्लंन करणाऱ्या व वाहने न तपासता पीयुसी प्रमाणपत्र जारी करणाऱ्या 15 पीयुसी सेंटर्स धारकांचे प्राधिकारपत्र निलंबित व 4 पीयुसी सेंटर्सधारकांचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले आहे.

१ जून २०१९ ते ३० जून २०१९ या कालावधीत वायु प्रदुषण करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहिम आयोजित करुन प्रमाणापेक्षा जास्त व ठळकपणे दिसुन येणाऱ्या वायुप्रदुषित करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश वायुवेग पथकांना देण्यात आलेले आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!