Type to search

आरटीई अंतर्गत 53 टक्के विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

आरटीई अंतर्गत 53 टक्के विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

Share

नाशिक । प्रतिनिधी
मोफत शिक्षणाचा अधिकार (आरटीई )अंतर्गत प्रवेशप्रक्रियाअंतर्गत पहिल्या सोडतीमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध झालेल्या जिल्ह्यातील 3 हजार 517 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या दहा दिवसांत केवळ 47 टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. अजूनही जवळपास 53 टक्के विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश तीन ते चार दिवसांत पूर्ण करून घेण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.

अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळूनही अद्याप प्रवेश मिळालेले नाहीत. यामध्ये अर्ज करताना शाळा व घर यातील नोंदवलेले अंतर आणि गुगल मॅपिंगवरील अंतरातील तफावत, खोटे पत्ते, अपूर्ण कागदपत्रे, अर्जांमधील त्रुटी यासह इतर विविध कारणांमुळे आरटीईच्या प्रवेशप्रक्रियेत अडथळे येत आहेत.

त्यामुळेच पहिल्या लॉटरीत जिल्ह्यातील 3 हजार 517 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असली तरी 11 ते 20 एप्रिल या दहा दिवसांत केवळ 1 हजार 663 प्रवेश झाले आहेत. हे प्रमाण अवघे 47 टक्के एवढेच असून पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळूनही अद्याप प्रवेश मिळू न शकलेल्या 53 टक्के विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.

आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाने 8 एप्रिल रोजी पहिली लॉटरी जाहीर केली होती. त्यात समावेश असलेल्या 3 हजार 517 विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 24 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

मात्र 11 ते 20 एप्रिल या दहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील 457 शाळांमध्ये केवळ 1 हजार 673 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिल्या यादीतील प्रवेशासाठी आता फक्त तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे उर्वरित 53 टक्के प्रवेश कसे पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अर्ज बाद
आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी जिल्ह्यातील 457 शाळांतील 5 हजार 735 जागांसाठी तब्बल 14 हजार 995 अर्ज आले. 8 एप्रिल रोजी पहिला लकी ड्रॉ काढण्यात येऊन पुढील प्रक्रियेसाठी पडताळणी समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर काही पालकांनी खोटे अंतर व कागदपत्रांचा मुद्दा उपस्थित करत तक्रार केली होती. त्यामुळे खोट्या पत्त्यांच्या आधारे सादर झालेल्या प्रवेश अर्जांची कसून तपासणी केल्यामुळे अनेक अर्ज या प्रक्रियेतून बाद झाले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!