Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

रोईंगपटू दत्तू भोकनळची अटक टळली; 29 मे ला सुनावणी

Share

नाशिक । पत्नीचा छळ व फसवणुकीच्या गुन्ह्यात राष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ याचा अटकपूर्व जामिन जिल्हा व सत्र न्यायालयाने मंजुर केल्याने तुर्त त्याची अटक टळली आहे. त्याच्या जामीन अर्जावर मात्र निर्णय बाकी असून, 29 मेला त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

नाशिक ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला कर्मचार्‍याने भोकनळविरोधात तक्रार दिली आहे. गांधर्वपद्धतीने विवाह केल्यानंतर पुन्हा सार्वजनीक विवाह करण्यासाठी तारीख दोनदा ठरवूनही तो विवाहाला उपस्थित राहिला नाही आणि त्यामुळे फसवणूक झाल्याचा आरोप पत्नीने केला आहे.

दत्तू भोकनळने सर्व आरोप फेटाळून लावत अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली. अ‍ॅड. जगदीश वैशंपायन, अ‍ॅड. चार्वाक कांबळे, अ‍ॅड. अजीत सोनवणे, अ‍ॅड. स्वप्नील रायते यांनी भोकनळची बाजू मांडली. बचाव पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आज, भोकनळचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. यामुळे त्याची अटक टळली आहे. तर या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी दत्तूने न्यायालयात अर्ज दाखल केला असून, त्यावर 29 मे ला सुनावणी होणार आहे.

आशा दत्तू भोकनळ असं तक्रारदार महिलेचे नाव आहे. सध्या नाशिक ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या आशा भोनकळ यांच्या तक्रारीनुसार दत्तू विरोधात आडगाव पोलिस ठाण्यात 16 मे रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 22 डिसेंबर 2017 ते 3 मार्च 2019 या दरम्यान ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते.

याच दरम्यान दोघे आडगाव येथील नाशिक पोलिस मुख्यालय आणि पुण्यातील रोइंग रोड एकमेकांना भेटले. यावेळी दत्तूने आशा यांच्याशी विवाह केला. मात्र या विवाहाची माहिती त्याने नातेवाईकांना दिली नाही. त्यामुळे सर्वांसमक्ष विवाह करण्यासाठी आशा यांनी तगादा सुरू केला. त्यानुसार 9 फेब्रुवारी रोजी विवाह ठरला होता.

लग्नाची तयारी सुरू असताना दत्तूने काहीतरी कारण सांगून हा विवाह पुढे ढकलला. असाच प्रकार पुन्हा काही दिवसांनी सुद्धा झाला. आपली फसवणूक होत असल्याचे समोर आल्याने आशा यांनी पोलिस ठाणे गाठून फसवणुकीसह कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार फिर्याद दिली. या वृत्ताने नाशिकसह राज्यभरात खळबळ उडाली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!