Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिकरोड : उद्या होणाऱ्या गणेशविसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस संचलन

Share

नाशिकरोड : अंनत चतुर्दशी (दि. १२) रोजी होणाऱ्या गणेशोत्सव निमित्त गणेश मुर्ती विसर्जन काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी
याकरिता नाशिकरोड, उपनगर पोलिसांच्यावतीने नाशिकरोड जेलरोड परिसरात पोलीस संचलन करण्यात आले,

येत्या गुरुवार (दि. १२) रोजी गणेश मुर्ती विसर्जन असून या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता पोलिसांच्या वतीने खबरदारी घेण्यात येत असून त्याचाच भाग म्हणून हे संचलन करण्यात आले.

सायंकाळी पाच वाजता नाशिकरोड पोलीस ठाण्यापासून पोलीस उपायुक्त खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, भारतकुमार सूर्यवंशी यांच्या उपस्थित संचलन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी चौक, देवी चौक, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सुभाषरोड, मुक्तीधाम चौक, बिटको पॉईंट, जेलरोड, सैलानी चौक आदी ठिकाणी करण्यात आली. या वेळी राज्य राखीव पोलीस दल, जलद पथक, क्यूआर टी पथक आदींसह सुमारे ३०० पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!