Type to search

नाशिकरोड : बाहेरगावी गेल्याची संधी साधून पावणे तीन लाख रुपये लंपास

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिकरोड : बाहेरगावी गेल्याची संधी साधून पावणे तीन लाख रुपये लंपास

Share

नाशिकरोड : बाहेरगावी गेल्याची संधी साधून रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील प्रवेश करीत साडे आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ५९ हजार रुपये रोख असा सुमारे २ लाख ७१ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या चेहडी येथील शिवशक्ती अपार्टमेंट मध्ये राहणारे मधुकर सुखदेव सांगळे हे (दि. २५) मे रोजी कुटुंबासह कल्याण येथे कार्यक्रमासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कडी कुलूप तोडून आत प्रवेश केला.

घरातील कपाटातून साडे तीन तोळ्याचे सोन्याचे गांठण, अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन, सोन्याचे नाणे, चांदीचे देव, ५९ हजार रुपये रोख असा सुमारे २ लाख ७१ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास नाशिकरोड पोलीस करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!