प्रवासी भरण्यावरून रिक्षा चालकांत हाणामारी

0

नवीन नाशिक (प्रतिनिधी) : प्रवासी भारण्याच्या कारणावरून एका रिक्षा चालकाने दुसऱ्या रिक्षा चालकाला मारहाण केल्याची घटना येथील त्रीमुर्ती चौकात घडली असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात तीन रिक्षा चालकां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षा चालक प्रतीक अशोक अढांगळे यांच्या फिर्यादीवरून राहुल सुभाष सांगळे, सतीश कैलास चौधरी व सुशील सोपान उदगीर यांच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात कलम 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

LEAVE A REPLY

*