Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

एलआयसीच्या ‘असिस्टंट’ परीक्षेचा निकाल जाहीर; नाशिक विभागातून ११४८ उमेदवार उत्तीर्ण

Share

नाशिक | प्रतिनिधी

भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे (एलआयसी) ‘असिस्टंट’ पदाच्या भरतीसाठी देशभरात ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये नाशिक विभागातून १ हजार १४८ उमेदवार उत्तीर्ण झाले असून या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा २२ डिसेंबर २०१९ रोजी घेण्यात येणार आहे.

चोवीस वर्षांपासून रखडलेली विमा क्षेत्रातील तृतीयश्रेणी कर्मचार्‍यांची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशभरातून आठ हजार जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन परीक्षा झाली. त्यामध्ये हजारो उमेदवारांनी सहभाग नोंदविला. असिस्टंट क्लार्क पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेनंतर आता मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. कर्मचारी बढती किंवा निवृत्तीमुळे २४ वर्षांमध्ये वर्ग तीनची सुमारे २७ हजार पदे रिक्त आहेत.

सद्यस्थितीत देशभरात विमा कर्मचार्‍यांची संख्या १ लाख १० हजार आहे. यातील वर्ग तीन आणि चारमधील कर्मचार्‍यांची संख्या ५७ हजार, तर वर्ग एकचे कर्मचारी ३१ हजार आणि दोनचे कर्मचारी २२ हजार आहेत. वर्ग तीनमध्ये प्रामुख्याने लिपिकांचा समावेश होतो. विमा क्षेत्राच्या कामकाजाचा विस्तार पाहता लिपिकांची मोठ्या संख्येने गरज आहे. मात्र, रखडलेल्या पदभरतीमुळे कार्यरत कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण वाढला आहे. अखेर दोन दशकानंतर ही भरती सुरू झाल्यामुळे विमा कार्यालयातील मनुष्यबळ वाढणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!