Type to search

नाशिक

प्लास्टीक राष्ट्रध्वजाची निर्मिती, विक्री व वापरावर बंदी

Share

नाशिक : प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा करताना राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा, प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 15 जानेवारी 2019 ते 31 जानेवारी 2019 या कालावधीत प्लास्टिकचा वापर करुन राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती, विक्री व वापर करणे यावर संपुर्ण नाशिक जिल्ह्यात (पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) बंदी घालण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी रामदास खेडकर यांनी दिले आहेत.

राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जाणे गरजेचे आहे. काही वेळेस राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी तसेच विशेष कलाक्रिडा प्रसंगी वैयक्तीकरित्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज नंतर इतस्तत: टाकले जातात. हे दृष्य राष्ट्रप्रतिष्ठेला शोभणारे नाही. राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे.

केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने राष्ट्रध्वजाकरिता प्लास्टिकच्या वापरास मान्यता दिलेली नाही. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हे बोध चिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम क्र. 69/1971 व क्र. 51/2005 तसेच ध्वजसंहितेच्या तरतूदीनुसार दंडनीय अपराध आहे.  

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!