चाळीसगाव प्रकरणानंतर नाशिकमधील बीडीओंचे लेखणीबंद आंदोलन

0

नाशिक, ता. ३ : चाळीसगाव येथील गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांनी भर बैठकीत काल विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. राजकीय दबावामुळे हा प्रकार झालाचे सांगितले जाते.‍

आज त्याच्या निषेधार्थ नाशिक विभागातील पंचायत समितीतील सर्व अ आणि ब वर्गातील अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त महेश झगडे यांना निवेदन देत लेखणीबंद आंदोलन केले.

चाळीसगाव बीडीओंना अपमानास्पद वागणूक दिल्याने त्यांनी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

*