रासेगाव परिसरात सापडला पुरातन तोफगोळा

0

रासेगाव : येथे विष्णु शिवराम पवार यांच्या शेतात आज दुपारी शेतकाम करत असताना पुरातन काळातील वस्तु मिळाली असल्याने परिसरात कुतुहल निर्माण झाले आहे. ही वस्तु तोफगोळा असल्याचे जेष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक तहसीलदार यांच्याशी बोलणे झाले असुन ते उद्या पोलिसां समक्ष ती वस्तु ताब्यात घेणार असल्याचे बोलले जात आहे.

इतिहासकालीन तोफगोळ्याचा वापर हा तोफेसाठी होई. तोफेच्या तोंडातून तोफगोळा आत सरकवून वरून बत्ती देत. शिवरायांनी तसेच संभाजी राजेनी स्वराज्यात ठिकठिकाणी तोफगोळे बनविण्याचे कारखाने उभे केले होते, जेणेकरून परकियावर तोफगोळ्यासाठी अवलंबून राहता येऊ नये.

LEAVE A REPLY

*