रासबिहारी आंतर शालेय फुटबॉल चषक २०१८-१९’ चा भव्य शुभारंभ

0

नाशिक : ‘रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल’ आणि ‘फुटबॉल असोसीएशन ऑफ नासिक डिस्ट्रिक्ट’ यांच्या सहकार्याने आयोजित प्रथम ‘रासबिहारी आंतर शालेय फुटबॉल चषक’ स्पर्धेचा दिंनाक १२ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ९:०० वाजता रासबिहारी इंटरनॅशनल स्कुलच्या मैदानावर भव्य शुभारंभ झाला. दिंनाक १२ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०१९ दरम्यान होणा-या स्पर्धेचे उद्घाटन फुटबॉल असोसीएशन ऑफ नासिक डिस्ट्रिक्ट चे अध्यक्ष श्रीयुत अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. फुटबॉल असोसिएशन ऑफ नासिक डिस्ट्रिक्ट चे जनरल सेक्रेटरी अर्जुन टिळे, फुटबॉल असोसीएशन ऑफ नासिक डिस्ट्रिक्ट चे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश टिळे, रासबिहारी शाळेचे विश्वस्त श्रीरंगजी सारडा, मुख्याध्यापिका बिंदु विजयकुमार हे यावेळी उपस्थित होते.

“क्रिकेटप्रमाणे फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढावी यासाठी नाशिक फुटबॉल असोसिएशन अनेक वर्षापासून प्रयत्नात आहे. रासबिहारी शाळेने ही स्पर्धा आयोजित करून फुटबॉलप्रेमी खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.” असे मनोगत यावेळी अविनाश टिळे व्यक्त केले.

फुटबॉल चषक आयोजित केल्याबद्दल धर्माधिकारी यांनी शाळेचे संचालक यांचे आभार मानले. अशा स्पर्धेतुन नाशिक जिल्हयातुन फुटबॉल संघाकरीता अनेक आंतर्राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होऊ शकतात. रासबिहारी फुटबॉल कप चे हे प्रथम वर्ष असून रासबिहारी क्रिकेट चषकाप्रमाणेच ह्या स्पर्धेतुन शालेय विद्यार्थ्यांकरीता फुटबॉल या खेळासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सकाळच्या सत्रात रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल आणि न्यू एरा स्कूल तसेच नवरचना इंग्लिश मीडियम स्कूल आणि जेम्स इंग्लिश मीडियम स्कूल यांमध्ये सामने घेण्यात आले. यात रासबिहारी स्कुल आणि न्यू एरा स्कुल संघात रासबिहारी संघाने ८ गोल करून सलामी विजय नोंदविला. यात रासबिहारी संघाचा कर्णधार मास्टर यश पाटिल याने ६ व्या मिनिटात फुटबॉल करंडकाचा पहिला गोल केला. मास्टर मानस देशमुख याने २ गोल केले. प्रतिस्पर्धी स्पर्धी संघ मध्यंतरापूर्वी एकही गोल करू शकले नाही. मध्यंतरानंतर रासबिहारी संघाची खेळी अजूनच आक्रमक झाली. यश पाटील याने २ गोल, मानस देशमुख याने २ गोल आणि कनक पोकर याने १ गोल करून रासबिहारी संघाचे एकूण गोल संख्या ८ वर नेवून पहिल्या सामन्यात एकतर्फी बाजी मारली.

तर नवरचना इंग्लिश मीडियम आणि जेम्स इंग्लिश मीडियम स्कूल संघामध्ये झालेल्या सामन्यात नवरचना इंग्लिश मीडियम संघाने ३ गोल करून सामना जिंकला. नवरचना शाळा संघाचा मास्टर रोहित बीक आणि मास्टर वेदान्त बागुल यांनी प्रत्येकी १ असे २ गोल केले. यादरम्यान जेम्स स्कूल संघाचे खेळाडू गोल करण्यासाठी झुंज देत होते परंतु त्यांचे प्रयत्न फोल ठरले, ते एक ही गोल करू शकले नाही. मध्यंतरानंतर नवरचना संघाच्या मास्टर स्वराज याने २८ व्या मिनिटाला अजून एक गोल करून सामना ३-० ने जिंकला.

फ्रावशी इंटरनॅशनल स्कूल आणि गोल्डन होरायझन स्कूल सामन्यात फ्रावशी संघाने ७-० ने बाजी मारली. मध्यंतरापूर्वी मास्टर आर्यन कांदे याने दुस-या व १३ व्या मिनिटाला २ गोल केले तर मास्टर तनिश ने १, मास्टर वेद देवकर याने १ असे एकूण ४ गोल केले. दरम्यान गोल्डन होरायझन संघाचे खेळाडू एक ही गोल करू शकले नाही. मध्यंतरानंतर फ्रावशी इंटरनॅशनल स्कूल संघाने आघाडी कायम राखत आणि ३ गोल करून खेळावरची पकड अजूनच मजबूत केली. अखेर पर्यंत गोल्डन होरायझन स्कूल संघाला कोणतीही संधी न देता आपली आघाडी कायम राखत फ्रावशी संघाने ७-० ने बाजी मारली.

तर दूसरीकड़े एस्पायलर स्कूल आणि श्री स्वामीनारायण स्कूल यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात एस्पायलर संघाने ४-१ विजय मिळवीला. एस्पायलर संघाचा मास्टर सुयश याने १ , मास्टर अक्षत पालवे याने २ , मास्टर धैर्य याने १ असे एकूण ४ गोल केले. मध्यंतरापूर्वी स्वामीनारायण स्कूल संघाच्या मास्टर मनीष अहिरे याने १ गोल केला. परंतु स्वामीनारायण संघ मध्यांतरानंतर सुद्धा एकही गोल करू शकला नाही. एस्पायलर स्कूल संघाने एकतर्फी सामना जिंकला.

LEAVE A REPLY

*