Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरी : आंबेवणी येथे आढळला दुर्मिळ ‘चित्रांग नायकूळ’

Share

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी येथे शेतात अतिशय दुर्मिळ प्रजातीचा चित्रांग नायकुळ बिनविषारी साप आढळून आला. यावेळी सापाला सुरक्षितरित्या पकडून ओझरखेड वनोद्यानात सोडण्यात आले.

आंबेवाणी येथील शेतकरी मनोज दत्तात्रय वडजे यांच्या मळ्यात हा दुर्मिळ प्रजातीचा साप आढळून आला. करंजीचे सर्पमित्र दिपक धामोडे, त्यांचे सहकारी मित्र ऋषिकेश सुर्यवंशी अभिजीत राजगुरु यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत साप पकडला.

तालुक्यात पहिल्यादांच अशा जातीचा साप आढळून आला असून दिंडोरी वनविभागात या दुर्मिळ सापाची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर या सापास ओझरखेड वनउद्यान या ठिकाणी सोडण्यात आला आहे.

सापाचे वर्णन : 

चित्रांग नायकूळ ( बिनविषारी )
Slender Racer/Gunther’s Recer (Coluber Gracilis)
सरासरी लांबी : ४० सें. मी. (१ फूट ४ इंच)
अधिकतम लांबी : ९३ सें. मी. (३ फूट १ इंच)
रंग व आकार : राखाडी-तपकिरी रंगाच्या शरीरावर काळी किनार असलेले पिवळे खवले. पोटाकडचा भाग पांढरा. खवले डोक्याकडे गडद तर शेपटीकडे अस्पष्ट. डोक्यावर काळी किनार असलेली इंग्रजी ‘व्ही’ ( V ) आकाराची खूण.
प्रजनन : मादी अंडी घालते या व्यतिरिक्त फारशी माहिती उपलब्ध नाही.
खाद्य : जंगली पाली व छोटे सरडे.
आढळ : नाणे घाट, फलटण, अहमदनगर, पुणे , सोलापूर तसेच असिगढ ( मध्य प्रदेश ).
वास्तव्य : माळरान.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!