Type to search

नाशिक

शिवकार्य गडकोटच्या वतीने रामशेजला स्वच्छता मोहीम

Share

नाशिक : शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची ९४ वी दुर्गसंवर्धन श्रमदान मोहीम (दि.१५) रोजी किल्ले रामशेजवर पार पडली. दुर्गसंवर्धकानी यां श्रमदान मोहिमेत रामशेजच्या पायथ्यापासून माथ्यावरील सर्वच कचरा (प्लास्टिक , खाऊचे पुढे, बॉटल्स, प्रसादाचे साहित्य इ.) गोल करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात आल्या. यावेळी किल्ल्याच्या माथ्यावर असलेल्या प्राचीन देवी मंदिराच्या शेडच्या दुरुस्तीसाठी संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

रामशेजचा चेहरा मोहरा बदलावण्याच्या दृष्टीने रामशेजवर दोन वर्षांपासून सातत्याने मुक्कामी व दिवसाच्या श्रमदान मोहिमांमध्ये किल्ले रामशेजचा चेहरा मोहरा बदलला. किल्ल्यांवरचे मुख्य द्वाराचा बुरुज,तटबंदीच्या आतील कचरा काढणे, गोमुखी द्वार स्वच्छ ठेवणे, सैनिकांचे जोते, चुन्याचा घाणा, सरदाराचा वाडा, शस्रगार काटेरी सांबरे काटे, कचरामुक्त करणे, किल्ल्यावरील कुंड, टाके यातील माती, गाळ, दगड, प्लास्टिक, कचरा काढला. किल्ल्यावरील १९ टाक्यांची तळापासून स्वच्छता करण्यात आली.

तसेच रामशेजवर शिवकार्यच्या वतीने लवकरच किल्ल्यावर येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांसाठी सूचना नियमावली फलक लावला जाणार असून दर रविवारी पर्यटन पोलिसांचा किल्ल्यावर पोलीस बंदोबस्त असावा याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांना भेटून पत्र देण्यात येईल. उपद्रवी टोळक्यांचा बिमोड करण्यासाठी दर रविवारी सातत्याने पोलिसांचा किल्ले पाहणी दौरा ही आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती संस्थेच्या वतीने किल्ल्यावर झालेल्या बैठकीत ठराव करून देण्यात आली.

येत्या रविवारी २२सप्टेंबर २०१९ रोजी चांदवड तालुक्यातील किल्ले इंद्राई किल्ल्यावर ९५ वि दुर्गसंवर्धन श्रमदान मोहीम होणार असल्याची यावेळी देण्यात आली. यावेळी रामशेज मोहिमेत संस्थेचे पदाधिकारी तथा गड संवर्धक उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!