Video : रामचंद्र जाधव लिखित ‘अंधारातून उजेडाकडे’ या पुस्तकाचे प्रकाशन

0

नाशिक /प्रतिभा पगारे : रामचंद्र जाधव लिखित ‘अंधारातून उजेडाकडे’ या पुस्तकाचा प्रकाशन करण्यात आले. रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार साहित्यिक उत्तम कांबळे होते. जेष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी नीलिमा पवार, बाळासाहेब सानप, डॉ. सुधीर तांबे, किशोरभाऊ दराडे, अपूर्व हिरे, सूर्यकांत रहाळकर, रत्नाकर अहिरे, प्रकाशक शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यावेळी म्हणाले, रामचंद्र जाधव यांच्या कांदबरीत संघर्ष दडलेला आहे. त्या संघर्षात यश खेचून घेण्याची ताकद आहे. आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवाना, घटनांना लेखकांनी शब्दबद्ध केले असून आपल्या जीवनाची चित्तर कथा या कादंबरीतून आपल्याला दिसून येते.

 

LEAVE A REPLY

*