Type to search

पारख इलेकट्रोनिक्सच्या राजेंद्र पारख यांची आत्महत्या

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पारख इलेकट्रोनिक्सच्या राजेंद्र पारख यांची आत्महत्या

Share

नाशिक | प्रतिनिधी
महात्मागांधी रोड येथील पारख इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजेंद्र पारख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज (दि.९) सकाळी उघडकीस आला.

राजेंद्र सुंदरलाल पारख (५२, रा. गोकुळवाडी, गंगापूररोड) असे त्यांचे पुर्ण नाव आहे. प्रत्यक्षदर्शी तसेच पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी राजेंद्र पारख हे नेहमीपेक्षा लवकरच आठ वाजेच्या सुमारास महात्मागांधी रोडवरील आपल्या पारख इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात आले होते. तर सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांचे दुकानातील कामगार दाखल झाले.

परंतु दुकानाचे शटर बंद असल्याने कामगारांनी ते उघडताच समोर छताला राजेंद्र पारख हे साखळीने गळफास घेऊन लटकत असल्याचे त्यांना दिसले. यामुळे त्यांनी आरडाओरड करताच इतर व्यवासायिकांनी दुकानात धाव घेतली. त्यांनी पारख यांना खाली उतरवून तात्काळ खासगी रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत कले.

पारख यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरिक्षक धात्रक हे करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!