Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

राज ठाकरेंचा ‘लाव रे तो व्हिडिओ’ गुगलच्या ट्रेंडिंगवर

Share

नाशिक : सध्या प्रचाराच्या रणधुमाळीत राज ठाकरेंची भाषणे सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे या भाषणातील त्यांचे ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्य सर्व नेटकऱ्यांच्या तोंडपाठ झालं आहे. याद्वारे अनेक मिम्स जोक्स व्हायरल होत आहेत.

दरम्यान पुणे येथे गुरुवारी राज ठाकरे यांची सभा पार पडली. यामध्ये ते म्हणाले कि, देशभरात माझी भाषणे पाहिली जातात याचा आनंद वाटतो. राज्यातील राजकीय वातावरण मागील आठवड्याभरापासून ढवळून काढणाऱ्या राज यांचा बोलबाला केवळ प्रचारसभांमध्येच नाही तर गुगल ट्रेण्ड्समध्येही दिसून येत आहे.

गुगलवर ‘Raj Thackeray’ हे दोन शब्द सर्च करणाऱ्यांचे प्रमाण मागील सात दिवसांमध्ये अनेक पटींनी वाढल्याचे गुगलच ट्रेण्डसमध्ये दिसत आहे. राज यांनी गुगलवर सर्च होण्याच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही प्रचंड फरकाने मागे टाकल्यामुळे नेटीझन्सचा ओढा पुन्हा एकदा अन्य नेत्यांच्या तुलनेत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नसलेल्या राज ठाकरेंच्याकडे असल्याचे दिसून येत आहे.

राज ठाकरे यांची नांदेड येथील पहिली सभा आटोपल्यानंतर त्यांना गुगलवर सर्च करण्यास राज ठाकरेंनी आपल्या दौऱ्याला नांदेड येथील १२ एप्रिलच्या सभेपासून सुरुवात केली. गुगलवर याच तारखेपासून राज ठाकरे सर्च करणाऱ्या भारतीयांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!