Type to search

Breaking News आरोग्यदूत आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

एकदा चव चाखाव्या अशा आरोग्यदायी रानभाज्या

Share

नाशिक । दि. १० प्रतिनिधी : निसर्ग माणसाच्या जगण्याशी निगडित असतो. प्रत्येक पावलावर माणसाला निसर्गाची गरज भासत असते. हवामानानुसार निसर्गाची किमया बदलत असते. पावसाळ्यात निसर्ग विविध रंगाची उधळण करीत असतो. विविध प्रकारची फुले, वनस्पती, रानभाज्या यावेळी पाहायला मिळतात. आपल्याला माहित असणाऱ्या शहरी भाजीपाल्यापेक्षा निसर्गात अनेक आरोग्याला पोषक असणाऱ्या भाज्या असतात. त्यांना रानभाज्या म्हणून ओळखले जाते.

बदलत्या जीवनशैलीमुळे आज मनुष्या च्या आहारात अनेक पालेभाज्यांचा समावेश होतो. तसेच त्या पालेभाज्या या बारमाही ठरलेल्या दिसून येतात. दरम्यान रानभाज्या आज ठिकठिकाणी बाजारात पाहावयास मिळतात. नव्हे आता शहरी भागातही हळूहळू रानभाज्या माहिती होत आहे. पावसाळ्यात येणाऱ्या, ग्रामीण भागात हमखास खाल्ल्या जाणाऱ्या कित्येक रानभाज्या अजूनही बाजारात उपलब्ध नाहीत.

पावसाळा सुरवात झाली कि, या रानभाज्या वाढू लागतात. जिल्ह्यातील डोंगराळ भाग असलेल्या त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, कळवण, पेठ या ठिकाणी रानभाज्या मोठ्या प्रमाणावर पाहावयास मिळतात. येथील आदिवासी बांधव जंगलामधून, रानातून गोळा करून ते बाजारात विकायला आणतात. फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसातच म्हणजे वर्षांतून फक्त एकदाच मिळणाऱ्या ह्य़ा भाज्यांना विशेष महत्त्व आहे.

या पाच रानभाज्या आरोग्यवर्धक

शेवग्याची फुले : शेवग्याच्या झाडाच्या फांद्या खुप ठिसुळ असतात. पावसाळ्यात बर्‍याचदा मोठ्या शेवग्याच्या फांद्या वार्‍याने पडतात. या झाडाची फुले भाजीसाठी उपयोगात आणतात.

भारंग : या पानांची सुकी भाजी केली जाते. ही भाजीसुद्धा झाडाचे नवीन फुटलेल्या कोंबाच्या व पानांच्या स्वरूपात काढली जाते. करवतीसारख्या दातेरी पानांच्या कडा असल्याने याला सिरॅटम् असे म्हटले जाते. यांच्या पानामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. या झाडास निळसर जांभळ्या रंगाचे फुलांचे तुरे येतात.

टाकळा : मेथीच्या भाजीसारखी दिसणारी टाकळयाची भाजी असते. रानात गवताबरोबर टाकळ्याची भाजी रानोमाळ पसरलेली दिसते.

नळीची भाजी : महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारी ही वनस्पती असून या वनस्पतीचे वेल जमिनीवर पसरत वाढतात. नागिणीच्या उपचारात ही वनस्पती वापरली जाते. तसेच कावीळ, श्‍वासनलिका दाह व यकृतविकारात या वनस्पतीचा उपयोग होतो.

मोरशेंड : या वनस्पतीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. या भाजीच्या सेवनामुळे रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण कमी होऊन सांध्यांची सूज कमी होते.

भुईआवळी : याची पाने, कोवळी खोडे व फांद्या भाजी करण्यासाठी वापरतात. फ्ल्यूसारख्या थंडी-तापाच्या आजारात, तसेच वरचेवर सर्दी-खोकला, ताप येणे अशा लक्षणांत ही भाजी नियमितपणे खावी.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!