Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पावसामुळे जिल्ह्यात 27 टँकर घटले; येवला अजूनही तहानलेला

Share

नाशिक । प्रतिनिधी
मागील तीन दिवसापासून दमदार पाऊस होत असला तरी आवर्षणग्रस्त तालुके अजुनही तहानलेले आहे. पावसामुळे 27 टँकर घटले आहे. मात्र, सदयस्थितीत अजूनही 197 टँकरद्वारे जिल्ह्याची तहान भागवली जात आहे. सर्वाधिक पाण्याचे दुर्भिक्ष्य हे येवल्यात असून या ठिकाणी 41 टॅकरने पाणी पुरवले जात आहे. पुढील काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास टँकरची संख्या घटण्याची शक्यता आहे.

जुलै महिना सुरु झाला असला तरी जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाने दडी मारल्याने शासनाने येत्या एक ऑगस्टपर्यत दुष्काळ व टचाई निवारण उपाय योजनांना मुदत वाढ दिली होती. रविवार (दि.28) पर्यंत जिल्ह्यात 224 टँकर सुरु होते. मात्र, मागील तीन दिवसापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. कमी अधिक प्रमाणात सर्वत्र पाऊस पडत आहे.

परिणामी जिल्ह्यातील टँकरची संख्या एका दिवसात 27 ने घटली आहे. सध्या जिल्ह्यातील सात तालुक्यात 197 टँकरने पाणी पुरवले जात आहे. पावसामुळे सर्वाधिक टँकर हे सिन्नर तालुक्यात कमी झाले आहे. या ठिकाणी पूर्वी 39 टँकर सुरु होते. त्यात 12 टँकरने घट झाली आहे.

त्या खालोखाल नांदगाव तालुक्यात 9, चांदवड व मालेगावमध्ये प्रत्येकी 2, बागलाण व येवल्यात प्रत्येकी एक टँकरची घट झाली आहे. सात तालुक्यातील 155 गावे व 491 वाडयांंची तहान टँकरने भागवली जात आहे.

तालुकानिहाय टँकर
बागलाण – 38
चांदवड -12
देवळा – 16
मालेगाव – 30
नांदगाव – 33
सिन्नर – 27
येवला – 41

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!