Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

250 टन कांदा भिजला; पॉलिशेडचे नुकसान

Share

नाशिक ।  प्रतिनिधी
वळवाचा पावसाने जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात झोडपले असून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली असून तीन जणांना प्राण गमवावे लागले. 250 टन हून अधिक कांदा भिजला आहे. सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वीज पडून एकाचा तर भिंत खचून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे.

राज्यभर वळवाचा पाऊस सुरु आहे. नाशिक जिल्ह्यालाही पावसाची प्रतीक्षा होती. सोसाट्याचा वारा व विजेच्या कडकडाटासह शनिवारी (दि.8) मान्सूनपूर्व वळवाच्या पावसाने शहर व जिल्ह्यात जोरदार सलामी दिली. शहर व उपनगरीय परिसरात 150 हून अधिक वृक्ष कोसळून पडले. अनेक ठिकाणी वृक्ष पडल्याने चारचाकी व दुचाकीचे नुकसान झाले.

येवला, सिन्नर, चांदवड, मनमाड यांसह अनेक तालुक्यांमध्येही वळवाच्या पावसाने दाणादाण उडवली. काही ठिकाणी घराचे छत, पत्रे उडाले. शेकडो घरांची पडझड झाली; तर कुठे जनावरे दगावली. अनेक ठिकाणी कांदा चाळीचे भिजून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. साधारणत: 250 टन कांदा भिजल्याचे समजते. शेतकरी व कांदा व्यापार्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथे बाळू सावंत या शेतकर्‍याचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. येवला तालुक्यातील आडगाव चौथवा येथे लताबाई आहेर व निफाड तालुक्यातील काथरगाव येथील द्वारकाबाई रणपिसे या दोन्ही महिलांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.

काही ठिकाणी गावाच्या प्रवेशद्वाराच्या कमानी कोसळल्या. बदापूर येते जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले. तसेच, अनेक शेतामधील पॉली शेड उडाले. द्राक्ष बागांनाही वळवाचा मोठा फटका बसला.

सोसाट्याचा वारा व गारांच्या पावसामुळे पॉलीहाऊसचा पेपर पूर्णपणे फाटला आहे. जवळपास पाच ते सात लाखांचे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.
– शिवराम धारबळे, आडगाव

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!