Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गोदावरीला पुन्हा पूर; गंगापूरमधून विसर्ग वाढवला; होळकर पुलाखाली अकरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

Share

नाशिक | प्रतिनिधी 

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास विसर्ग करण्यात आला. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गंगापूरमधून १८४७ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे होळकर पुलाखाली अकरा हजार पेक्षा अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोदावरीला पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

पावसाची संततधार सुरूच असल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणे 100% भरले आहेत. त्यामुळे संततधार पावसामुळे सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. म्हणून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

गंगापूरमधून गोदावरीत सायंकाळी विसर्ग करण्यास सुरुवात झाली. तसेच शहरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोदावरीतील पाणीपातळी वाढली आहे.

होळकर पुलाखाली अकरा हजार क्युसेक्सपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदी, नाले, ओढा यामध्ये प्रवेश करु नये तसेच पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडून नये. विद्युत खांबापासून दूर रहावे. जनावरांना नदीपत्रापासून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावेत.

त्याचप्रमाणे वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करु नये, तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, धोकेदायक क्षेत्रात सेल्फी काढू नयेत, पंचवटी क्षेत्रातील भाविकांची वाहने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

नासर्डी परिसरात असलेली परिस्थिती

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!