Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पेठ : पावसाच्या लपंडावा मुळे भात लावणी लांबणीवर

Share
कोहोर | वार्ताहर : पेठ तालुक्यात व कोहोर परिसरात दोन आठवड्यापूर्वी मुसळधार पावसाने सर्वच ठिकाणी भात शेतीसाठी उपयुक्त असलेले पाणी उपलब्ध झाल्याने भात लावणीच्या कामाला वेग आला होता.
मात्र, गेल्या पाच दिवसापासून पावासाने विश्रांती घेतल्याने ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने पाणी कमी झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भात लागण बंद केली असून, आता  शेतकरी दमदार पावसाची वाट पाहू लागला आहे.
परिसरात ज्याठिकाणी भरपूर पाणी आहे, तेथे भात लागणीसाठी अवनातील खाचरांमध्ये शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. पेठ तालुका हा संपूर्ण डोंगरी भाग असल्याने भात हेच प्रमुख पीक असून, भातासाठी पावसाची मोठ्या प्रमाणात गरज असते. आदरामध्ये भाताचे रोपे दिवसेंदिवस वाढत असून पावसाअभावी परिसरात भाताची लागण खोळंबली आहे. पाऊस पडला नाही तर भाताची शेती संकटात सापडण्याची शक्यता आहे.
पेठ तालुक्यात पर्जन्यमान  जास्त असल्यामुळे भात हे उदरनिर्वाहाचे मुख्य पीक आहे. जून महिन्याच्या अगोदर येथे धूळवाफेवर भात पेरणी केली जाते. इंद्रायणी, कोमल, आर-चोवीस, दप्तरी, बासमती, आर-पी, मेनका, कावेरी व पांरपारिक बियाणे आदी जातींच्या रोपांच्या भात लागवडीस शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.
उपलब्ध असलेल्या पाण्याच्या ठिकाणी विद्यूतमोटरीने पाणी अवनात आणून बैलांच्या व ट्रँक्टरच्या साहाय्याने भात खाचरात चिखल करण्यात येत आहे. व मंजूराच्या साहाय्याने भात लागणी सूरु आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!