Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

ऐन पावसाळ्यात मराठवाड्याचा घसा कोरडा का?

Share

नाशिक | गोकुळ पवार :  एकीकडे कोल्हापुरात हाहाकार असतांना मराठवाड्यातील जनता पाण्यासाठी वणवण भटकत आहे. पावसाळ्याचे दोन महिने संपून तिसरा महिना लागला असला तरी मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. ऐन पावसाळ्यात मराठवाड्याचा घसा कोरडा का? असा प्रश्न नागरिकांना पडतो.

दरम्यान राज्यातील नाशिक, पुणे ,मुंबई, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी महापुराने थैमान घातले. अजूनही सांगली , कोल्हापूर या ठिकाणी पूर ओसरला नसून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ठिकाणी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक जण सरसावले असून एकीकडे ओला दुष्काळ तर एकीकडे सुका दुष्काळ पाहावयास मिळत आहे. नुकतेच हवामान खात्याने सांगितले कि, राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असून त्या त्या ठिकाणातील प्रशासनाने अतिदक्षतेचा इशाराही जाहीर केला. असे असूनही मराठवाड्याच्या नशीबी दुष्काळ का ? असा प्रश्न पडतो.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यातही पाऊस १००% कोसळणार असून या दोन महिन्यात मराठवाड्यात पाऊस पडेल का ? अशी आशा येथील शेतकऱ्यांना आहे. कारण शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या असून पीक वाया जाऊ नये यासाठी पुढील आठ दहा दिवसांत पाऊस होणं गरजेचे आहे. त्यामुळे दुबारपेरणीचे संकटही आ वासून उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे. मराठवाड्यात फक्त ३५ टक्के पाऊस झाला असल्याने जोरदार पाऊसाची प्रतीक्षा येथील शेतकऱ्यांना आहे. तसेच जनावरांना चारा तसेच पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने यंदा जायकवाडीसाठी १५ ते २० टीएमसी पाणी सोडण्यात आले असून अदयाप पर्यंत ७० टक्क्यापर्यंत पोहचले आहे. तरीदेखील गेल्या १० वर्षातील सर्वाधिक भीषण दुष्काळ यंदा मराठवाडा अनुभवत आहे. त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग एकदाचा मराठवाड्यात होत आहे. काल (दि. ०८) सर्व तयारी पूर्ण झाली असून शुक्रवारी कृत्रिम पाऊस पाडण्याचे ट्रायल केले जाणार आहे. त्यानंतर पुढे नियोजन करून पाऊस पाडला जाणार आहे.

मराठवाडा हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. अरबी समुद्रा कडून आलेले बाष्प सह्याद्रीच्या पर्वतामुळे अडविले जातात. परिणामी कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला परंतु मराठवाड्यात पाऊस कमी झाला. बंगालच्या उपसागराकडून आलेले बाष्पामुळे विदर्भ आणि कोल्हापूर, सांगली, सातारा, दक्षिण महाराष्ट्र, या ठिकणी पाऊस झाला तर मराठवाडा अद्यापही तहानलेलाच आहे.
-किरणकुमार जोहरे, हवामान तज्ज्ञ

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!