Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

PhotoGallery/Video : नाशकात ठिकठिकाणी मुसळधार; दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी

Share

नाशिक : शहरातही काल दुपारापासून सुरु झालेला पाऊस अजूनही सुरूच असल्याने गोदावरीला पूर आला आहे. यामुळे दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे. दरम्यान रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गंगापूर येथील सोमेश्वर धबधबा ओव्हर फ्लो होऊन वाहत आहे.

आज सकाळी ८ वाजेपासून ते ४ वाजेपर्यंत नाशिक शहरात ९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी क्षेत्रात शनिवारी पावसाचे जोरदार आगमन झाले. रविवारी पहाटे ला गोदावरीला पूर आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी सकाळी नऊपर्यंत जिल्ह्यात ६७८ मिलिमीटर पाऊस झाला. तर इगतपुरीत १७० मिमी, त्र्यंबकेश्वरमध्ये १३५ मिमी, पेठमध्ये १०५ मिमी, सुरगाण्यात १०४ मिमी पावसाची नोंद झाली.

(फोटो / व्हिडीओ : सर्व प्रतिनिधी)

या पावसामुळे गोदावरीतील पाणी पातळीत मोठी वाढ असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले असून नदीकाठच्या परिसरात पाणी शिरल्याने स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिकांची धांदल उडाली.

शहरासह परिसरात शनिवारपासून झालेल्या संततधारेने गोदावरीसह वालदेवी, नासर्डी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून स्थानिक नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज झालेल्या पावसामुळे सिटी सेंटर मॉल जवळील नासर्डी पूल येथील खेतवानी लाँन्स इमारतीवर झाड कोसळले. रात्री एक वाजेपासून शहरातील सिडको, पंचवटी, सातपूर, इंदिरानगर, नाशिकरोड परिसरांत पावसाचा जोर कायम असून रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. .

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!