Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

गंगापूर 34 तर दारणात 38 टक्के जलसाठा

Share

नाशिक ।  प्रतिनिधी
नाशिक, त्र्यंबक व इगतपुरी येथे शनिवारी व रविवार जोरदार पाऊस कोसळल्याने या क्षेत्रातील धरणाच्या पाणीसाठयात वाढ झाली आहे. त्रंबकला एका दिवसात 200 मिलीमीटर व नाशिकमध्ये 102 मिलीमीटर इतका पाऊस पडल्याने नाशिक शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर धरणातील साठा 13 वरुन 34 टक्कयांवर पोहचला आहे.

तर, इगतपुरीत 63 मिलीमीटर इतका पाऊस झाल्याने दारणा धरणाची पाणी पातळी वाढली असून 38 टक्के इतका जलसाठा झाला आहे. दरम्यान, वरील तालुक्यात सोमवारी देखील पावसाची रिपरिप सुरु असून दोन्ही धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ होत आहे.

जून महिना जवळपास कोरडा गेल्याने दुष्काळाने होरपळणार्‍या जिल्ह्यात पाणीबाणीचे संकट निर्माण झाले होते. जिल्हयातील 24 धरण अवघा 4 टक्के जलसाठा शिल्लक होता. जिल्हावासियांना पावसाची प्रतीक्षा होती. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरवात झाली. गत शनिवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ व इगतपुरी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली.

नाशिक व पेठ मध्ये पावसाने सेंच्युरी मारत शंभर मिलीमीटरचा आकडा पार केला. तर गंगापूर धरण हे पाण्यासाठी पूर्णपणे त्र्यंबकेश्वर तालुक्यावर अवलंबून आहे. या ठिकाणी एकट्या रविवारी 200 मिलीमीटर पाऊस कोसळला. तसेच, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार सुरु होती. परिणामी गंगापूर धरणाच्या साठा हा 34 टक्कयांवर पोहचला.

तेरा टक्यावर असलेल्या जलसाठयात 21 टक्यांनी वाढ झाली. तसेच गंगापूर धरण समूहातील जलसाठा 28 टक्यांवर पोहचला. शहराची तहान भागविणार्‍या गंगापूर धरण समूहात वाढ झाल्याने नाशिककरांना काहिसा दिलासा मिळाला आहे. मात्र, तूर्तास तरी शहरवासियांवर असलेली पाणी कपात कायम राहण्याची चिन्हे आहेत.

तर, ईगतपुरी तालुक्यातही 63 मिलीमीटर इतका पाऊस झाला. त्यामुळे नाशिकसह नगरची तहान भागविणार्‍या दारणा धरणात 38 टक्के इतका जलसाठा झाला आहे. दरम्यान, वरील तालुक्यांमध्ये सोमवारीही संततधार सुरु असल्याने पुढील काळात साठ्यात आणखी वाढ होणार आहे. जिल्ह्यातील एकूण धरणाचा जलसाठा 8 वरुन थेट 14 टक्यावर गेला आहे

सात धरणे कोरडीठाक
पाच ते सहा जिल्ह्याचा अपवाद वगळता इतर तालुक्यांमध्ये पावसाने अदयाप दडी मारली आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोडणारी पुणेगाव, तिसगाव, भोजापूर, चणकापूर, केळझर, नागासाक्या, व माणिकपूंज या 7 धरणांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. या ठिकाणी दमदार पावसाची अपेक्षा आहे.

धरणातील जलसाठा
गंगापूर – 34
काश्यपी – 24
गौतमी गोदावरी – 21
आळंदी – 14
पालखेड – 18
करंजवण – 2
वाघाड – 6
ओझरखेड – 2
दारणा – 38
भावली – 39
मुकणे – 12
वालदेवी – 3
कडवा – 8
नांदूरमधमेश्वर – 54
हरणबारी – 3
गिरणा – 7
पुनद – 3

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!