Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video | नाशिक : गंगापूर धरण ६७ टक्के; तर भावली १०० टक्के भरले

Share

नाशिक | प्रतिनिधी 

इगतपुरी , त्र्यंबकेश्वर परिसरात गेल्या दोन दिवसांपासुन सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून गंगापूर धरण ६७ टक्के भरले तर भावली तर १०० टक्के भरले आहे. आहे.

दरम्यान काही दिवस गायब झाझालेल्या पावसाने अचानक एन्ट्री केल्याने नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात जोरदार हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशीही इगतपुरी, त्र्यंबकेशवर तालुक्यात पावसाने जोर धरल्याने येथील धरणांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढ होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे भात आवणीचे कामे खोळंबली होती. ती पुन्हा सुरु झाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!