Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जुने नाशिक : जोगवाडा भागात भिंत कोसळली

Share

जुने नाशिक | प्रतिनिधी
जुने नाशिक भागातील धोकादायक वाड्यांचा विषय गंभीर होत आहे आज पुन्हा पावसाच्या संततधारामुळे जोगवाडा भागातील एका जुन्या वाड्याची भिंत कोसळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही, तरी दोन दुचाकींचे नुकसान झाले. मनपा अग्नीशामक दलाच्या एका बंबसह जवानांनी तसेच स्थानिक तरुणांनी त्वरीत बचाव कार्य केल्याने अनर्थ टळला.

जुने नाशिक भागातील जुन्या व धोकादायक वाड्यांचा विषय दर पावसाळ्यात येतो, मात्र मनपा प्रशासन याकडे विशेष लक्ष देत नसल्याने पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जोगवाडा अल्बा टेलरच्या समोरील एका बंद वाड्याची भींत अचानक कोसळली. पावसाचे पाणी त्यात जात होते.

भिंत पडल्याचे जोरदार आवाज आल्याने परिसरातील नागरी भयभीत झाले. काहींनी त्वरीत अग्नीशामक दलाला फोन करुन माहिती दिली. यावेळी समाजसेवक नदीम मणियार यांच्यासह जोऐब शेख, मुदस्सर सय्यद, लबीब अंसारी, शादाब अंसारी आदी तरुणांनी बचाव कार्य सुरू केले.

ज्या वाड्याची भींत कोसळली त्यात बर्‍या दिवसांपासून कोणी राहत नव्हते, अशी माहिती लोकांनी दिली. मात्र मातीत बदल्याने मोटारसाकल (क्र. एमएच ०४. डीएफ ९०४१) सह एक ऍक्टीव्हा असे दोन दुचाकींचे नुकसान झाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!