Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जुने नाशिक येथील कांबळे वाडा कोसळला

Share

जुने नाशिक : कथडा अमरधाम रस्त्यावरील भाेई गल्लीमधील दुमजली कांबळे वाड्याची एक बाजू संततधार पावसाने रविवारी (दि.७) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास कोसळली. अग्निशमन दलाचे जवान वाड्याची पुर्व पाहणी करण्यासाठी आले असता कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून सर्व कुटुंबांना बाहेर हलविले आणि क्षणार्धात वाड्याची एक बाजू वेगाने कोसळली.

काजीपु-यातील धोकादायक झालेल्या एका बंद वाड्याची भिंत मनपा पुर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी उतरवून घेतली. दरम्यान, रविवारी भोई गल्लीमधील दुमजली भव्य वाड्याची कमकुवत झालेली एक बाजू संपुर्णत: कोसळली.

भोई गल्लीचा परिसर दाट लोकवस्तीचा असून या वाड्याजवळच सुमंत नाईक उर्दू शाळा असून येथून नागरिकांची तसेच मुलांची सतत वर्दळ सुरू असते. रविवारची सुटी असल्यामुळे शाळा दुपारच्या सुमारास बंद होती.

तसेच संततधार सुरू असल्याने वर्दळही कमीच होती. साडेचार वाजेच्या सुमारास अग्निशामक मुख्यालयाला ‘कॉल’ आला. लिडिंग फायरमन श्याम राऊत, नाना गांगुर्डे यांच्यासह पुर्व बांधकाम विभागाच्या कर्मचा-यांनी वाड्यातील विक्रांत कांबळे यांच्यासह अन्य तीन कुटुंबातील रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले आणि वाड्याची एक बाजू कोसळली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी वाड्याची पाहणी करत संभाव्य धोका ओळखून तत्काळ रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी धाव घेतली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!