Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : पावसामुळे २७ घरांची पडझड; चार जनावरे वाहून गेले

Share

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जीवितहानी तसेच वित्तहानी झाली आहे.

त्र्यंबक तालुक्यात सर्वाधिक २०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून या पुरात चार जनावरे वाहून गेल्याची माहिती आहे. तसेच मुसळधार पावसामुळे या ठिकाणी १८ घरांची पडझड झाली आहे. अनुक्रमे इगतपुरी ७, पेठ ०१, येवला ०१ असे एकूण २७ घरांची पडझड झाली आहे. अ

दरम्यान गेल्या दोन दिवसांत त्र्यंबकेश्वर येथे २०० मि.मी, इगतपुरी ६३ मि.मी, नाशिक १०२ मि.मी, पेठ ११६ मि.मी, येवला १५ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तर नांदगाव, मालेगाव, बागलाण, देवळा, कळवण या ठिकाणी अद्याप पाऊस झालेला नसून येथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!