Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय सार्वमत

राधाकृष्ण विखे पाटील : विरोधीपक्ष नेतेपद ते राज्यमंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद

Share

नाशिक : राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होत असून राज्य मंत्रीमंडळात राधाकृष्ण विखे पाटील यांना संधी मिळाली आहे. त्यांनी नुकतीच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची उपस्थितीत सकाळी अकरा वाजेपासून मंत्रिमंडळ विस्ताराला सुरवात झाली आहे.

दरम्यान विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते होते. डॉ. सुजय विखे पाटील काँग्रेसला सोडचिट्ठी दिली होती. त्यावेळेपासूनच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चा रंगल्या होत्या. आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने राजकीय वातावरणात बदल झाला आहे.

यावेळी विखे पाटील यांच्याबरोबर मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार, जयदत्त क्षीरसागर त्याचप्रमाणे संजय कुटे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

तसेच मागील मंत्रीमंडळात असलेल्या प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, दिलीप सावरा, विष्णु कांबळे या विद्यमान मंत्र्य़ांना डच्चू मिळाला आहे. राज्य मंत्रीमंडळात आरपीआयच्या अविनाश महातेकर यांना संधी मिळाली असून अशा प्रकारे भाजपला १० तर शिवसेना २ व आरपीआयच्या महातेकराचा मंत्रीमंडळात समावेश आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!