Type to search

maharashtra

मुक्त अध्ययनाला ७ हजार दोनशे जणांचे प्रवेश

Share
पुनर्मूल्यांकन शुल्कवाढ मागे घ्या; विद्यार्थ्यांची मागणी; Revoke raised revaluation fees; Demand by students

नाशिक । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी उत्तम प्रतिसाद लाभला आहे. आत्तापर्यंत ७ हजार दोनशे हून आधिक प्रवेश निश्चित झाले असून प्रवेश घेण्याची मुदत देखील विद्यापीठाने वाढविली आहे.

आता २० नोव्हेंबर २०१९ पर्यंत या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. इच्छुकांनी www.unipune.ac.in.soI या वेबसाइटवर नोंद करावी, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. विद्यापीठाने या वर्षापासून मुक्त अध्ययन प्रशालेमार्फत विविध अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मुख्यत: एमकॉम, बीकॉम, एमए, बीए अशा अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद लाभला आहे. ही मुदत वाढवल्यामुळे आता आणखी विद्यार्थी, नागरिक याचा लाभ घेऊ शकतील, अशी माहिती मुक्त अध्ययन प्रशालेचे संचालक डॉ. संजीव सोनावणे यांनी दिली.

या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. ते विद्यापीठाने नेमून दिलेल्या केंद्रांवर लवकरच सुरू होईल, असेही डॉ. सोनावणे यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!