Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक-पुणे महामार्गावरील  मोहदरी घाटात अपघातामुळे वाहतूक ठप्प 

Share
सिन्नर | विलास पाटील 
नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर  सिन्नरदरम्यान असलेल्या मोहदरी घाटात आज सायंकाळी  6 वाजेच्या सुमारास दोन मालवाहू ट्रकचा अपघात झाल्याने महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूनी ठप्प झाली होती. यावेळी लांबच लांब वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
नाशिक बाजूकडून असणाऱ्या घाटातील शेवटच्या वळणार पहाटेपासून नादुरुस्त असणारा मालट्रक  उभा होता. या ट्रकला सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास नाशिक कडून येणाऱ्या डांबर भरलेल्या टँकरने पाठीमागून धडक दिली. या अपघातामुळे दोन्ही बाजूच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या.
एरवी तपासणी व कारवाईच्या नावाखाली वाहनधारकांना त्रास देणारे वाहतूक पोलीस अपघातानंतर तासाभराने दाखल झाले. मात्र वाहनाच्या रांग लांबवर गेल्याने वाहतूक सुरळीत करण्यात अडचणी येत होत्या. सुमारे 2 तास उलटून देखील वाहतूक सुरळीत झाली नव्हती. शिंदे येथील टोल प्लाझा कडून देखील क्रेन अथवा इतर मदत पोहोच न झाल्याने वाहन धारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!