Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

लक्ष्मीपूजनाला नाशिक-पुणे विमानसेवा होणार पूर्ववत; बुकिंग सुरु, प्रवाशांमध्ये चैतन्य

Share

नाशिक | प्रतिनिधी 

गेल्या अनेक महिन्यांपासून खंडित असलेली नाशिक-पुणे विमानसेवा अखेर पूर्ववत होणार आहे. येत्या २७ ऑक्टोबरपासून लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर नाशिकहून पुण्याच्या दिशेने पहिले उड्डाण घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.

नाशिक-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अलीकडेच बुकिंगदेखील सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअर लाईनद्वारे आठवडाभर ही सेवा देण्यात येणार आहे. हैद्राबाद आणि अहमदाबादनंतर आता नाशिक पुण्याशी जोडले जाणार असल्यामुळे चैतन्य निर्माण झाले आहे.

अधिक माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी नाशिक-पुणे ही विमानसेवा एअर डेक्कनकडून सुरु करण्यात आली होती. त्यानंतर अज्ञात कारणास्तव अनिश्चित काळासाठी ही सेवा बंद पडली. त्यानंतर उडान योजनेच्या लिलावामध्ये नाशिक पुणे मार्गला जागा देण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा या मार्गावर विमानसेवा होणार असल्याची चिन्हे दिसून येत होती.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपूर्वी हा मार्ग एअर अलायन्सकडे देण्यात आला.  कंपनीने नाशिक पुणे विमानसेवेसाठी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून २७ ऑक्टोबरपासून ही सेवा नियमित स्वरुपात सुरु होईल अशी घोषणाही केली होती. त्यानंतर नाशिककरांना या सेवेची उत्सुकता लागून होती.

ही सेवा सोमवार ते शनिवार देण्यात येणार असून दुपारी तीन वाजता विमान नाशिकहून निघेल आणि पुण्याला चार वाजता पोहचेल. तर, पुण्याहून दुपारी साडेचार वाजता हे विमान निघेल ते सायंकाळी साडेपाचला ते नाशिकला पोहोचेल.

तर रविवारी सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी विमान पुण्याला निघेल आणि तासाभरात ते पुण्याला पोहचेल. त्यानंतर सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी हे विमान पुण्याहून निघेल आणि सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी ओझरला येईल.  ७० आसनी असलेल्या या विमानामध्ये उडान अंतर्गत ३५ आसने राखीव असतील.

 

 

 


नाशिकच्या विकासाला चालना मिळेल

राज्यातील महत्वाच्या शहरामध्ये पुण्याचा समावेश आहे. पुण्यासोबतची एअर कनेक्टीव्हीटी झाल्याचा फायदा लहान मोठ्या उद्योगांना होणार आहे. एरव्ही पुण्याला जायला चार ते साडेचार तासांचा अवधी लागतो मात्र, अवघ्या तासाभरात आता पुणे गाठणे शक्य होणार आहे. पुण्याला जायला चार ते साडेचार तास लागतात. उद्योग छोट्या मोठ्या उद्योगला चालना मिळेल. पुणे आयटी क्षेत्रात पुढे येत असून नाशिकच्या आयटी क्षेत्रालाही याचा फायदा होणार आहे.

हेमंत गोडसे, खासदार, नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!