चष्म्याद्वारे गांधी विचारांचा प्रचार

0
नाशिक । जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी यांची जयंती उद्या सोमवारी अहिंसा दिवस म्हणून साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांनी 7 बाय 9 फूट अशी भव्य महात्मा गांधींच्या चष्म्याची प्रतिकृती बनवली आहे.

एम. जी. रोडवरील शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात सकाळी 10 वाजता हा भव्य चष्मा नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. इतक्या भव्य स्वरुपातील ही देशातील गांधीजींच्या चष्म्याची सर्वात मोठी प्रतिकृती असल्याचे शहर काँग्रेस सेवा दलाने म्हटले आहे.

महात्मा गांधींनी दिलेली सत्य आणि अहिंसेची शिकवण नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा चष्मा बनवण्यात आला आहे. गांधींचे हे विचार जगाला पटल्यामुळेच आज गांधी जयंती हा दिवस जगभर जागतिक अहिंसा दिवस म्हणून पाळला जात आहे.

गांधी विचारातून प्रेरणामहात्मा गांधी आणि त्यांचे विचार येणार्‍या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. गांधीजींच्या विचारांनी प्रेरीत होऊन हा भव्य चष्मा बनवण्याची प्रेरणा मिळाला. सोमवारी गांधी जयंतीनिमित्त सकाळी 10 वाजेपासून नागरिकांना हा चष्मा पाहण्यासाठी काँग्रेस कमिटीत ठेवण्यात येणार आहे. 

वसंत ठाकूर, चष्म्याचे शिल्पकार

LEAVE A REPLY

*